Enrolment For Academic year 2025 has commenced!

नमस्कार 

ओम गं गणपतये नमः 

आपल्या प्रत्येक कार्यात आपण  “ओम गं गणपतये नमः” असे  श्री गजाननाचे आवाहन करतो! ते कार्य सफल व संपूर्ण होण्यासाठी, हा “ओम” तयार होतो – अ, ऊ, म – या स्वरांनी!

यातील पहिला स्वर, अक्षर “अ” शिकवला जातो तो ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या बालवाडीच्या वर्गात !

संस्कृत भगवद गीतेतील अनमोल ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘देवनागरी’ भाषेचा ज्यांनी आधार घेतल्या त्या खुद्द ज्ञानियांचा राजाने या मराठी भाषेचा उल्लेख “अमृतातेही पैजा जिंके” असाच केला आहे.

निळ्याशार समुद्राने वेढलेल्या संपूर्ण दक्षिण गोलार्धातील आपली पहिली मराठी शाळा सुरु झाली १० फेब्रुवारी २००८ रोजी ग्लेनफ़िल्ड मध्ये !

मायबोलीचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान, हसत खेळत देऊ पुढल्या पिढीस मराठी भाषेचे वरदान !” हे ब्रीदवाक्य सार्थ करित ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय गेली १६ वर्षे  अत्यंत निष्ठेने, परिश्रमाने, सातत्याने कार्य करत आहे. 

२०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या अजून तीन शाखा वेस्टमीड, नॉर्थ सिडनी, वोलोंगॉंग  येथे सुरु झाल्या.

मराठी विद्यालयाच्या या चारही शाखा मराठी भाषा शिकवण्यासाठी त्यामध्ये – श्रवण, संभाषण, लेखन, वाचन – या  भाषेच्या चारही अंगांचा मुलभूत पाया भरभक्कम करण्यासाठी दर आठवड्याला अखंडपणे, अविरतपणे कार्य करित आहेत. 

मला आवर्जून सांगायचंय की अगदी Covid pandemic च्या काळात देखील ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय ऑनलाइन चालू होते. face to face आणि online असा आमचा parallel प्रवास चालू आहे आणि यापुढेही तो तसाच चालू ठेवण्याचा मानस आहे.

परदेशात येऊनही आपल्या मराठी भाषेबरोबर आपली नाळ कायमची जोडलेली असावी यासाठी “जागतिक मराठी भाषा दिन (२७ फेब्रुवारी)” दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. 

तसेच आपली गुरुपरंपरा जपण्यासाठी “गुरुपौर्णिमा”, “शिक्षक दिन” देखील साजरे केले जातात. म्हणजेच भाषेबरोबरच भारतीयांची संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी “ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय” कार्यरत आहे.

वाचनालय, लेखन स्पर्धा, शाळेची स्वतःची अभ्यासक्रमीत पुस्तके, प्रत्येक शिक्षकास iPad, printer, तसेच  निरनिराळॆ सण, सहली, उत्सव, मिनिस्टर अवॉर्ड्स या सर्वांतून ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाचे कार्य दिवसेंदिवस भरीव होत आहे आणि त्याचे श्रेय जाते ते निरपेक्षपणे शाळेचे काम करणाऱ्या आजी-माजी कार्यकर्ते, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना !

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही सरकार दरबारी ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाचा अतिशय अभिमानपूर्वक उल्लेख व कौतुक केले जाते. तसेच  Campbelltown Mayor, Fairfield Mayor, Liverpool Mayor हे मराठी शाळेस मदत करण्यास कायम तत्पर असतात. 

स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर सिडनी हे देखील ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयास त्यांच्या कार्यक्रमात, उपक्रमांमध्ये सहभागी करण्यास उत्सुक असतात.

Multi-Cultural Ministers Department, Community Languages Head, BOS, MMAI, SICLE, AICLS या व अशा अनेक संस्थांमध्ये ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाने आपला ठसा उमटविला आहे.

मुख्य म्हणजे १७ एप्रिल २०२० रोजी, Hindu Council of Australia (HCA) ने मराठी शाळेच्या सौ नेहा श्रीधर टकले यांना “गार्गी अवॉर्ड” साठी Finalist म्हणून सन्मानित  केले आणि HCA ने एकप्रकारे हा ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाचा खूप मोठा गौरव केला आहे; असे म्हटल्यास वावगं न ठरावं!

गेल्या १६ वर्षांत साधारणतः १५०० विद्यार्थ्यांनी मराठी भाषा शिकण्याचा आनंद घेतला आहे आणि यापुढेही मराठी विद्यालय असेच भरघोस कार्य करीत राहील याबद्दल आम्हास तिळमात्रदेखील शंका नाही.